सामाजिक कार्यकर्ते जयदीप चेंबूरकर यांच्या वतीने वडापाव वाटप



सामाजिक कार्यकर्ते जयदीप चेंबूरकर यांच्या वतीने गोरगरिबांना वडापाव वाटप

 

ठाणे

ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते जयदीप चेंबूरकर यांच्या वतीने रस्त्यावर राहणाऱ्या गोरगरिबांना वडापावचे वाटप करण्यात आले आहे. गेले 3 महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कामधंदे बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहे.तर रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांची अवस्था अत्यंत बिकट आहे ही बाब लक्षात घेऊन ठाण्यातील चरई येथील सामाजिक कार्यकर्ते जयदीप चेंबूरकर यांच्या वतीने रविवारी ठाण्यातील तीन हात नाका,नौका विहार मासुंदा तलाव व सेंट्रल मैदान परिसरात रस्त्यावर राहणाऱ्या गोरगरिब नागरिकांना मोफत वडापावचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. सध्या कोरोन संकटमध्ये नागरिक सापडले आहे.सर्वसामान्य नागरिक कसाबसा या संकटाला सामोरे जात आहे परंतु रस्त्यावर राहणाऱ्या गोरगरिबांवर अक्षरशः उपासमारी आली आहे अशा नागरिकांना जयदीप चेंबूरकर या सामाजिक कार्यकर्त्याने वडापाव वाटप करून केलेली मदतीमुळे या नागरिकांनी जयदीपचे आभार मानले आहे.