पीपीई कीट थेट तिप्पटदराने रुग्णांच्या माथी- मनसेने केली तक्रार दाखल


पीपीई कीट थेट तिप्पटदराने रुग्णांच्या माथी- मनसेने केली तक्रार दाखल


ठाणे :


कोरोनाच्या उपचारादरम्यान रुग्णालय प्रशासन वापरत असणारे पीपीई कीट थेट तिप्पटदराने रुग्णांच्या माथी मारले जात असल्याने याविरोधात मनसेने रितसर तक्रार दाखल केली आहे. पालिका आणि एफडीए विभागाकडे ही तक्रार दाखल करण्यात आली असून कारवाई न झाल्यास रुग्णालय आणि संबंधित औषध विक्रेत्यांना मनसे स्टाईल धडा शिकवू, असा इशाराही देण्यात आला आहे.  ठाण्यातील अंबिकानगर परिसरात असणा-या स्वस्तिक रुग्णालयामध्ये ११ ते १७ जूनदरम्यान कोरोना रुग्णावर उपचार करण्यात आले. या रुग्णाच्या एकूण बिलापैकी तब्बल ४९ हजार ३५० रुपये पीपीई किटचे लावण्यात आले. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी पाचंगे यांनी अधिक माहिती घेतली असता पीपीई किटचा दर २३५० रूपये इतका आकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली.


बाजारात अवघ्या ७५० ते ८०० रूपयांना उत्तम दर्जाचे फूड अँड ड्रॅग अॅडमिनिस्ट्रेशन प्रमाणित पीपीई कीट उपलब्ध असताना तिप्पट किंमतीचे पीपीई किट रुग्णालय आणि मेडिकलने नेमके कुठून आणले, असा संतप्त सवाल संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला. त्यामुळे या प्रकरणी रुग्णालय आणि संबधित मेडिकलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालिका उपायुक्त विश्वनाथ केळकर आणि अन्न-औषध विभाग परिमंडळ एकच्या सहाय्यक आयक्तु माधुरी पवार यांची भेट घेत निवदेनाद्वारे पाचंगे यांनी केली. याबाबत कठोर पावलं उचलून कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिल्याची माहिती पाचंगे यांनी दिली. खासगी रुग्णालय आणि मेडिकलच्या लुटीला रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक प्रचंड घाबरले आहेत. उपचार राहिले बाजूला लुटीच्या धास्तीने रुग्ण जेरीस आले आहेत. अशा रुग्णांनी मनसकेडे संपर्क साधावा, याबाबत प्रशासनाकडे योग्य पध्दतीने पाठपुरावा करुन त्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असे आवाहन संदीप पाचंगे यांनी केले आहे.



 



Popular posts
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
मंत्रालयात पुन्हा एकदा शॉर्ट सर्किट झाला आहे. मात्र, वेळीच सर्व स्विच बंद केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image