विक्रांत चव्हाण यांची ठाणे कॉग्रेंसच्या अध्यक्षपदी नियुक्ती
ठाणे
ठाणे शहरातील अभ्यासू नगरसेवक व ठाणे महानगरपालिका काँग्रेस गटनेते विक्रांत चव्हाण यांची ठाणे कॉग्रेंसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून ठाणे काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. मात्र अखेर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विक्रांत चव्हाण यांच्याकडे ठाणे जिल्ह्याची सूत्रे सोपवली आहेत.