पालकमंत्र्यांचा जिल्हा दौरा.....


ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषतः भिवंडी,शहापूर मुरबाड आदी भागात  लागवड करण्यात आलेली सर्वच्या सर्व ८० टक्के लागवड क्षेत्र बाधित झाले असून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना याआधीच सूचना दिलेल्या असून प्रत्येक शेतात कृषी व महसूल विभागा तर्फे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे पाहणी दौऱ्याच्या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याचे त्यांनी सांगितले, या संकटसमयी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल याबाबत सरकार निर्णय घेईल अशी ग्वाही पालकमंत्री शिंदे यांनी दिली. यावेळी शिवसेना ठाणे ग्रामीण चे  जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील,शहापूर विधानसभा मतदार संघांचे आमदार दौलत दरोडा,माजी आमदार पांडुरंग बरोरा, भिवंडी ग्रा. चे आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे, कृषी सभापती संजय निमसे,पंचायत समितीचे व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान पालकमंत्री शिंदे यांनी तालुक्यातील फणसपाडा येथे वीज पडून जखमी झालेल्या २६ जणांची शहापूर उपजिल्हारुग्णालयात जाऊन चौकशी केली व त्यांना धीर दिला. तसेच संबंधित डॉक्टरांना लक्ष द्या अशा सूचना केल्या.


 

Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image