आमदार रोहित दादा पवार विचारमंच या माध्यमातून मोफत रेशनचे वाटप

आमदार रोहित दादा पवार विचारमंच या माध्यमातून मोफत रेशनचे वाटप


ठाणे


आमदार रोहित दादा पवार विचारमंच या माध्यमातून पूर्णच आपत्कालीन परिस्थितीत ठाणे शहातील गणेश नगर दिवा पुर्व  दिवा व आनंद नगर, ओवळा घोडबंदर  काही भागात तर नंदुरबार, जळगाव, नांदेड , लातूर, बुलढाणा, कोकण व उत्तर प्रदेशातील गावातील हातावर पोट असणाऱ्या दारिद्र रेषेखालील गरजूंना मोफत रेशनचे वाटप केले. कोरोनाच्या अचानक आलेल्या संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले कित्येक गरीब, हातावर पोट असलेले मजूर यांना बेरोजगार होऊन घरी बसावे लागले, त्यामुळे त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा गरजुंना आमदार रोहित दादा पवार विचार मंचाच्या माध्यमातून  प्रमुख सल्लागार राज राजापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली  अध्यक्ष संजय बाविस्कर यांच्या प्रयत्नाने अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आणि रोहित दादा पवार विचार मंच कायम आपल्या सोबत राहील असा विश्वास देण्यात आला..!