माजी आमदार सुभाष भोईर यांनी केले वाहतूक पोलिसांना मास्कचे वाटप
ठाणे:
मुख्यमंत्री , शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पिंपरी, दिवा, एमआयडीसी, कोळे, उंबार्ली , गोळवली, लोकग्राम, कचोरे, भाल आदी ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सुमारे एक हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा २ जून रोजी वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते, मात्र यावर्षी वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले व वाढदिवसावर होणारा खर्च टाळत सामाजिकहीत जपले आहे. कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी माजी आमदार सुभाष भोईर यांच्या माध्यमातून शीळ, दिवा,मुंब्रा , मानपाडा पोलीस स्टेशन तसेच वाहतूक पोलिसांना मास्कचे वाटप, दिवा विभाग, शीळ डायघर व मानपाडा पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे कल्याणफाटा, मानपाडा वाहतूक पोलीस, मुंब्रा , शीळ अग्निशमन केंद्राचे अधिकारी व कर्मचारी, शासकीय कर्मचारी आणि निराधार व्यक्तींना दररोज एक हजार जेवणाची पाकिटे आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली.