ठाण्यातील पाचपाखाडी विभागात आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप

ठाण्यातील पाचपाखाडी विभागात आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप



ठाणे 


कोरोनच्या पार्शवभूमीवर नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेवक अ‍ॅड संदीप लेले व भाजपा ठाणे शहर सरचिटणीस सचिन केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवन आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले . ठाण्यातील पाचपाखाडी येथून या गोळ्या वाटपाला सुरुवात करण्यात आले आहे . यावेळी पाचपाखाडी भागातील नागरिकांना घरोघरी जाऊन नगरसेवक अॅड.संदीप लेले ,भाजपा ठाणे शहर सरचिटणीस सचिन केदारी यांच्या हस्ते या गोळ्यांचे वाटप करण्यात आले . यावेळी विनायक गाडेकर, महेश चौधरी, समर्थ नायक, संतोष केदारी,संतोष सिनलकर,आदी यावेळी उपस्थित होते. आयुर्वेद व्यासपीठ आणि जनकल्याण समिती यांचा माध्यमातून या गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत

संजीवन या आयुर्वेदिक गोळ्या सकाळी व रात्री दोन वेळा घेतल्या असता नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या गोळ्यांमुळेनागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील व या कोरोनापासून त्यांचे संरक्षण होईल यासाठी या ७० रुपये किंमत असलेल्या गोळ्या आम्ही नागरिकांना मोफत वाटप करत असून नागरिकांना आवश्यकतेनुसार प्रत्येक प्रभागात,वस्तीमध्ये याचे वाटप करण्यात येत असल्याचे नगरसेवक अ‍ॅड संदीप लेले यांनी यावेळी सांगितले