ठाण्यातील खालसा टीमच्या वतीने तृतीयपंथीयांना अन्नदानाचे वाटप

ठाण्यातील खालसा टीमच्या वतीने तृतीयपंथीयांना अन्नदानाचे वाटप


ठाणे


कोव्हीड-१९ चे जग प्रभावित झाले आहे.सुमारे तीन महिने लॉकडाऊन असल्याने याचा सर्वाधिक परिणाम रोजंदारीवर काम करणारे मजूर, कंत्राटी कामगार आणि आदिवासी बांधवांवर झाला आहे. त्यातच ज्यांना आपण तृतीयपंथी म्हणतो त्यांच्यावर तर याचा फारच परिणाम झाला. कोणतेही कमाईचं साधन नसल्याने घरीच उपासमार सहन करावी लागत होती. घरात काही नाही, पण घराबाहेर पडू शकत नाही अशा अवस्थेतील  लोकांसाठी ठाण्यातील खालसा टीमच्या वतीने या समाजाकरिता अन्नदानाचे वाटप करण्यात आले. ठाण्यातील तीन हात नाका येथील गुरुद्वारामधून हे कार्य नियमित सुरुच आहे. ७ जुन रोजी या विशेष टिमने पुन्हा एकदा या लोकांसाठी अन्न उपलब्ध करून दिले. याबद्दल त्या सर्वांनी आभार व्यक्त केले.