मढवी यांना "जागवली माणुसकी पुरस्कार -२०२० " प्रदान 

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने नगरसेविका प्रतिभा मढवी व डॉ राजेश मढवी यांना


"जागवली माणुसकी पुरस्कार -२०२० " प्रदान 




ठाणे

 

कोरोनाने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे आणि या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, पत्रकार, समाजसेवक आणि साहित्यिक यांनी अथक मेहनत करुन समाजाची मदत केली.त्यांनी आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण केला. त्यांच्या महनीय कार्याचा सन्मान व्हावा यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघ, ठाणे जिल्हा यांच्या वतीने ऑनलाईन पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी  व ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष,भाजपा उपाध्यक्ष डॉ राजेश मढवी यांना कोरोना महामारीच्या या काळात नागरिकांना मदत करून केलेल्या निस्वार्थ सेवाकार्याबद्दल  " जागवली माणुसकी पुरस्कार -२०२० " देऊन गौरवण्यात आले आहे.

नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी  व ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष,भाजपा उपाध्यक्ष डॉ राजेश मढवी यांना भारतीय जनता पार्टी व ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या कोरोना काळात संकटात सापडलेल्या गोरगरीब नागरिकांना,सफाई कर्मचारी,फवारणी कर्मचारी यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप,परराज्यात जाणाऱ्या नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी व वैद्यकीय दाखले दिले,भाजी खरेदीसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकऱ्याची भाजी आपल्या दारी उपक्रम राबिवला,सरकारी कर्मचारी,सफाई कर्मचारी,डॉक्टर,नर्स,पोलीस,बँक कर्मचारी यांचे कोरोनापासून सरंक्षण व्हावे यासाठी मास्क,फेस शिल्ड,सॅनिटायझर अशा सेफ्टी किटचे वाटप केले ,घरात अडकलेल्या जेष्ठ नागरिक व आजारी व्यक्तीना घरपोच औषध सेवा, ,सिव्हिल रुग्नालयातील नर्स व कर्मचाऱ्यांना प्रोटीनयुक्त आहार दिला,कचरा संकलनासाठी सोसायटीमध्ये कचऱ्याच्या डब्यांची व्यवस्था केली,प्रतिभा बचत गटाच्या माध्यमातून विभागात कोरोनाबाबत जनजागृती तसेच शहरातील पोलीस,वाहतूक पोलीस यांना नियमित अल्पोपहार,प्रभागातील पालिकेचे डॉक्टर्स आणि कर्मचार्यांना जेवणाची सोय,प्रभागातील सोसायट्यांना सॅनिटायझर स्टॅन्ड ,औषध फवारणी यंत्र व औषधाचे वाटप,कब्रस्तान मधील कर्मचार्यांना पीपीई किटचे सुरक्षा कवच,सोसायटी,चाळ आदी भागातील नागरिकांना कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी अर्सनिक अल्बम-३० गोळ्यांचे वाटप,रक्तदान शिबीर,गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाला सेंट्रल मैदान भाजी मार्केटसाठी उपलब्ध करून दिले, खाजगी लॅबमध्ये कोरोना तपासणी नागरिकांना परवडणारी नव्हती यासाठी भाजप कवच माध्यमातून तीन हजारात कोरोना चाचणी उपल्बध करून देण्यात देखील मढवी दाम्पत्याचा खारीचा वाट आहे,  आदी  अनेक कामे त्यांनी या कोरोनाकाळात केली असून अजूनही करत आहेत मढवी दाम्पत्यांनी केलेल्या या निस्वार्थ सेवेबद्दल त्यांना महाराष्ट्र पत्रकार संघ,ठाणे जिल्हा यांच्या वतीने  "जागवली माणुसकी पुरस्कार -२०२० " देऊन गौरवण्यात आले आहे.