कोविड रुग्णालयासाठी जोशी-बेडेकर महाविद्यालय क्वारंटाईन सेंटर

कोविड रुग्णालयासाठी जोशी-बेडेकर महाविद्यालय क्वारंटाईन सेंटर


ठाणे :


 कोविड रुग्णालयासाठी ठाणे महापालिकेने मंगळवारी विद्या प्रसारक मंडळाचे जोशी-बेडेकर महाविद्यालय ताब्यात घेतले. महाविद्यालयाचा परिसर अधिग्रहण करीत असल्याचे पत्राद्वारे सांगून मंगळवारी दुपारी महाविद्यालयाचा थेट ताबा घेण्यात आला आहे.  कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रभाग समितीनिहाय शाळा, महाविद्यालये किंवा सभागृह क्वारंटाइन सेंटरसाठी ताब्यात घेण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. त्यानुसार विद्याप्रसारक मंडळाला जोशी-बेडेकर महाविद्यालय कोविड रुग्णांसाठी ताब्यात घेणार असल्याचे सोमवारी महापालिकेने पत्राद्वारे कळवले. मंगळवारी दुपारी पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाचा ताबा घेतला.  महापालिकेने कायद्यानुसार महाविद्यालय क्वारंटाइन सेंटर म्हणून ताब्यात घेतले आहे आणि तसे महाविद्यालयाला कळविले आहे, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिका याने सांगितले.