जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर
ठाणे
ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पाच पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज एन.के. टी. सभागृह, ठाणे येथे जाहीर करण्यात आली. यावेळी उप जिल्हाधिकारी ( प्रशासन) अभिजीत भांडे पाटील यांनी उपस्थितांना आरक्षण सोडत प्रक्रिया समजावून सांगितली. यावेळी तहसीलदार ( सर्वसामान्य) राजाराम तवटे, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मा. विधानसभा सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. ही प्रक्रिया कोव्हिड-१९ बाबत शासन निर्देशांचा अवलंब करून मर्यादित स्वरूपात आयोजित करण्यात आली होती.
सदर आरक्षण खालील प्रमाणे
१) अध्यक्ष जिल्हा परिषद, ठाणे- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ( महिला)
२) पंचायत समिती, शहापुर - अनुसूचित जमाती ( महिला )
३) पंचायत समिती, अंबरनाथ - अनुसूचित जमाती ( महिला )
४) पंचायत समिती, मुरबाड - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
५) पंचायत समिती,कल्याण - सर्वसाधारण (महिला)
६) पंचायत समिती, भिवंडी - सर्वसाधारण