'मिशन बिगिन अगेन' मध्ये नागरिकांना लांब प्रवासासाठी मात्र मनाई

'मिशन बिगिन अगेन' मध्ये नागरिकांना लांब प्रवासासाठी मात्र मनाई


मुंबई


राज्य सरकारने ३१ मे रोजी 'मिशन बिगिन अगेन'ची घोषणा करीत नियमावली जाहीर केली होती. मात्र, त्यात बदल करण्यात आले असून नव्या मार्गदर्शक सूचना गुरुवारी जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मिरा भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ या भागांत आता नागरिकांना परवानगीशिवाय प्रवास करता येणार आहे. याआधी मात्र अत्यावश्यक सेवा आणि तातडीच्या कामासाठी परवानगी घेऊनच प्रवास करता येत होता. नागरिकांना जवळपास प्रवास करण्यास परवानगी असली तरी लांब प्रवासासाठी मात्र मनाई असेल. राज्य सरकारने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी ३ जूनपासून 'मिशन बिगिन अगेन' सुरू करण्याचे जाहीर केले होते. मात्र, निसर्ग चक्रीवादळामुळे लोकांना दोन दिवस घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता. चक्रीवादळाचे संकट टळल्याने शुक्रवारपासून लोकांना घराबाहेर पडता येणार आहे. वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण करण्यासही ७ जूनपासून परवानगी देण्यात आली आहे. कॉलेज, शाळांमध्ये शिक्षणेतर कामे सुरू.  विद्यापीठ, कॉलेज आणि शाळा यांमध्ये शिकवण्याचे काम सोडून इतर कामे सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे. यात ऑनलाइन शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल जाहीर करण्यासाठीच्या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावता येईल.



Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image