कॉंग्रेसच्या वतीने शहीदांना श्रध्दांजली

कॉंग्रेसच्या वतीने शहीदांना श्रध्दांजली


ठाणे:


गलवाना खोऱ्यात चीनच्या हल्यात शहीद झालेल्या भारतीय सैन्यातील सैनिकांना शुक्रवारी ठाणे शहर कॉंग्रेसच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. ठाण्यातील तलावपाळी येथील महात्मा गांधी उद्यानातील महात्मा गाधी यांच्या पुतळ्यासमोर यावेळी शहीदांच्या प्रती मेणबत्ती लावून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.यावेळी चीनी सैन्याने हडपलेली जमीन परत घ्यावी अशी मागणी देखील करण्यात आली.विशेष म्हणजे कॉंग्रेस कमिटीतर्फे राज्यभर आजचा दिवस शहींदो को सलाम दिवस म्हणून पाळला गेला.
                ठाणे शहर काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने पदाधिकारी यावेळी सहभागी झाली होती.यावेळी चीनी सैन्याशी लढा देतांना गलवान खो-यात भारतीय जवान शहीद झाले.तसेच चीनी सैन्याने येथील जमीनही हडपली आहे.त्यामुळे ही जमीन परत घ्यावी,चीनला जशाच तसे उत्तर द्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.यावेळी अतिशय शांतपणो सर्व पदाधिकाऱ्यांनी शहीद जवानांना मानवंदना दिली.भारतीय सैन्यदल अतिशय ताकदवान आहे,ते चीन सैन्याला जशाच तसे उत्तर देऊ शकतात. परंतु केंद्र सरकारकडून त्यांना पाठबळ मिळणे अपेक्षित असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.



Popular posts
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
मंत्रालयात पुन्हा एकदा शॉर्ट सर्किट झाला आहे. मात्र, वेळीच सर्व स्विच बंद केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
दिल्ली इफेक्ट, मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय
Image