ठाणे महापालिका आयुक्तच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांचे 

ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन

 


 

 ठाणे

कॊरॊनाचा प्रादुर्भाव रोखण्यात ठाणे महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होत आहे त्यांना वेळेत रुग्णवाहिका व अन्य सुविधा उपलब्ध होत नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. 

कॊरॊनाचा ठाणे महापालिका हद्दीत दिवंसेदिवस प्रादुर्भाव वाढ आहे. एखाद्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले तरी ८ तास उलटून गेले तरी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही.  रुग्ण ताटकळत असतो. रुग्णवाहिका उपलब्ध झाली तर रुग्णालय आणि बेड उपलब्ध होत नाही. पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे तीन कोरोना बाधितांचा उपचारा आधीच जीव गेला आहे. पालिका प्रशासनाच्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी अविनाश जाधव यांनी  ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. पालिका आयुक्तांशी चर्चा करताना पालिका आयुक्तांना प्रश्नाची समाधानकारक उत्तरे देता आली नाही. हे पालिका प्रशासनाचे अपयश असल्याची टीका  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे.