ठाणे मनपा स्थायी समितीची तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी
तातडीने ठाणे मनपा स्थायी समितीची बैठक आयोजित करावी 

ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे व इतर सदस्यांची मागणी 

 

ठाणे

 

कोरोना आणि आगामी पावसाळापूर्व कामांच्या अंमलबजावणीचा प्रशासकीय आढावा घेण्यासाठी तातडीने येत्या आठवड्यात स्थायी समितीची बैठक आयोजित करावी अशी मागणी स्थायी समितीचे सदस्य, ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे व इतर सदस्यांनी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. 

आगामी पावसाळापूर्व कामे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होऊन अनेक निर्णय घेतले गेले. या आदेशांची अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी येत्या आठवड्यात स्थायी समितीची बैठक आयोजित करावी अशी मागणी हणमंत जगदाळे, भरत चव्हाण, संजय भोईर, शानू पठाण, विक्रांत चव्हाण आणि कृष्णा पाटील या सदस्यांनी केली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीकोनातून स्थायी समितीची बैठक महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात अयोजित करावी अशी सूचनाही हणमंत जगदाळे व इतर सदस्यांनी सभापतींना केली आहे.