ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत विनयभंग, अपहरण, घरफोडी आणि चोरीची  १५६ प्रकरणे

ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत विनयभंग, अपहरण, घरफोडी आणि चोरीची  १५६ प्रकरणे


ठाणे : 


ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारीचा आलेखही लॉकडाऊन काळातही काहीसा चढा राहिला आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत १ एप्रिल ते १५ मे या कालावधीत विनयभंग, लैंगिक अत्याचार, अपहरण, दुखापत वा हल्ला करणे, घरफोडी, दरोडे आणि चोरी यांसारखी १५६ प्रकरणे दाखल झाली आहेत. यात सर्वाधिक गुन्हे हे चोरी आणि हल्ल्याचे आहेत. आयुक्तालय हद्दीत ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी येथील शहरी भाग येतो. पोलीस आयुक्तालयात दर महिन्याला ७०० हून अधिक प्रकरणे दाखल होत असतात. टाळेबंदीत नागरिक घरातच होते, फक्त अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडत असतात. त्यामुळे या कालावधीत काही महत्त्वाच्या गुन्ह्य़ांत घट अपेक्षित होती.


एखाद्याला मारहाण करून दुखापत करण्याच्या ६३ घटना घडल्याची माहिती पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आली. टाळेबंदीच्या काळात पोलिसांवर बंदोबस्त, तसेच मजुरांचे नियोजन यांसारख्या कामांचा भार आहे. १ एप्रिल ते १५ मेपर्यंतच्या कालावधीत १५६ गुन्हे दाखल. यात ३५ चोरीच्या, १८ घरफोडय़ा, दोन दरोडय़ाच्या घटनाची नोंद झाली आहे. एप्रिलमध्ये अशा दहा प्रकरणांत आरोपींना अटक करण्यात यश. तसेच १० विनयभंग आणि आठ लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या. या कालावधीत लैंगिक अत्याचाराच्या पाच प्रकरणांत आरोपींचा शोध लावण्यात यश. विनयभंगाच्या तीन प्रकरणांत आरोपींना अटक करण्यात आली.  १ एप्रिल ते १५ मे या कालावधीत २० अपहरण वा घर सोडून गेल्याची प्रकरणे. याच कालावधीत एकूण १२ प्रकरणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.



 

Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image