नौपाडा कोपरी प्रभाग समितीती २२ प्रतिबंधित क्षेत्र

नौपाडा कोपरी प्रभाग समितीती २२ प्रतिबंधित क्षेत्र



ठाणे


ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने रुग्ण आढळलेले परिसर लॉकडाऊन केला जात आहेत. करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध हटविण्यात येतात. मात्र काही प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अजूनही रुग्ण आढळून येत असल्याने तेथील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. या क्षेत्रासह नव्याने घोषित करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांची महापालिका प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय यादी तयार केली आहे.


ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रामध्ये २२ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र आहेत. त्यात नौपाडय़ातील चरई, हरीनिवास, कोर्ट नाका पोलीस लाइन, टेंभीनाका, प्रशांतनगर, कोपरी ब्रीज परिसर, नागसेन नगर, राम मारुती रोड, गावदेवी बस आगार या भागातील अनेक इमारती तसेच परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. याशिवाय, प्रभाग समिती क्षेत्रातील रहेजा गार्डन, हाजुरी, रघुनाथनगर, आनंदनगर, महागिरी, चेंदणी कोळीवाडा, सिद्धिविनायक मंदिर कोपरी, कोपरी गाव या भागांतील अनेक इमारती तसेच परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत.


Popular posts
कल्याण-डोंबिवलीकरांसाठी 700 बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटल; खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती
Image
जान सानूच्या ‘भाषावादा’नंतर ‘बिग बॉस’च्या घरात वाजले ‘झिंगाट’ गाणे!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
बेस्टच्या अर्थसंकल्पात 1,887 कोटींची तूट, बेस्ट समितीच्या मंजुरीनंतर अर्थसंकल्प महापालिकेत सादर
Image
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या 12 जागांसाठी महाविकास आघाडीत चुरस; कोणाची नावं चर्चेत?
Image