गरीब भारतीयांना स्वस्त औषधे देण्याचे रतन टाटा यांचे स्वप्न

गरीब भारतीयांना स्वस्त औषधे देण्याचे रतन टाटा यांचे स्वप्न


ठाणे 



ठाणे शहरातील अठरा वर्षाचा मुलगा गेली दोन वर्षे जनरीक औषधे स्वस्त दरात वितरित करीत आहे. हे समजल्यावर त्याच्या या उपक्रमात सक्रीय  भागीदार म्हणून सहभागी होण्याचा निर्णय भारताचे प्रसिद्ध  उद्योगपती रतन टाटा यांनी घेतला आहे. अर्जुन  देशपांडे या ठाणेकर युवकाचा हा फार मोठा गौरव आहे. तसेच भारतीयांना स्वस्त दरात औषधे देण्याचे रतन टाटा यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणारी आहे.


अर्जुन देशपांडे याने वयाच्या १६व्या वर्षी जनरीक आधार या संस्थेची स्थापना केली. तो जनरीक आधारचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी झाला. भारतीय  सामान्य माणसाच्या उन्नतीसाठी ठराविक भारतीय फार्मा बिझिनेस साखळीत नाविन्यपूर्ण क्रांती घडवित त्याने भारतातील प्रत्येक शहरात परवडणारी औषधे उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट ठेवले व तसे काम सुरु केले. एकेका मेडिकल स्टोअरला पाठिंबा देत जनरीक आधार औषधे पुरविणारी ही पहिली कंपनी ठरली. अर्जुन देशपांडे यांच्या जनरीक आधारचा या कंपनीला बरीच स्पर्धा होती.


 मोठमोठ्या वैद्यकीय मॉल्स आणि ऑनलाइन फार्मसीमुळे त्याचा वाईट परिणाम झाला आहे. अर्जुन देशपांडे जेनेरिक आधारच्या माध्यमातून. एकेक मेडिकल स्टोअरला  ऑफलाइन + ऑनलाइन मदत करुन व्यवसाय  वाढीसाठी मदत केली. बी २ बी २ सी व्यवसाय मॉडेलमुळे मेडिकल स्टोअर्सना व्यवसाय वाढीसाठी जनरीक आधारचा मोठा आधार मिळाला आहे.                                                    


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image