शैक्षणिक वर्षाच्या फीमध्ये सवलत देण्याची आमदार सरनाईक यांची मागणी
ठाणे:
कोरोना महामारी रोखण्याकरिता देश लॉकडाऊन करण्यात आला. परिणामी अनेकांचे काम बंद झाले. काम बंद असल्याने हातात पैसा नाही. असे असताना काही शाळांनी पहिल्या टर्मच्या फीसाठी पालकांकडे तगादा लावला आहे. ठाणे आणि मीरा-भाईंदर भागात मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय कुटुंब राहतात. शाळा कधी सुरू होणार हा निर्णय अद्याप झाला नसला तरी अनेक शाळा ई क्लास सुरू करणार आहेत. अशात अनेक शाळांनी फीसाठी पालकांना फोन करण्यास सुरुवात केली आहे. शाळांकडून पहिल्या टर्मच्या फीची मागणी केली जात आहे. फी न भरल्यास मुलांना शाळेतून काढून टाकू तसेच ई-क्लासमध्ये घेतले जाणार नाही, अशा धमक्या देत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या फीमध्ये सहा महिन्यांची सवलत द्यावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण संस्थांकडे केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती पाहता अनेकांकडे काम नाही. हातात पैसा नसल्यामुळे अनेक कुटुंबांचे पूर्ण वर्षाचे आर्थिक गणित चुकले आहे. अशात जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. याची दखल घेत आमदार प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून पालकांना वेठीस धरणाऱ्या शिक्षण संस्थांवर कारवाई करावी तसेच पालकांना सहा महिन्यांच्या फीची सवलत द्यावी,