अहवाल येण्यापूर्वीच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

अहवाल येण्यापूर्वीच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात


ठामपा रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर


ठाणे 



ठामपाच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज  रुग्णालयाने हनुमाननगर येथील एका नागरिकाचा मृतदेह कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच नातेवाइकांच्या स्वाधीन केला. मात्र त्या मृत ५० वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्याच्या अंत्ययात्रेत अनेक नातेवाइकांनी स्मशानभूमीत गर्दी केली होती.  त्या सर्वांची शोध मोहीम आता सुरू झाली आहे. अशा प्रकारची आतापर्यंत ही तिसरी घटना आहे.


हनुमाननगर भागातील या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कळवा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, ३० एप्रिलला त्याचा मृत्यू झाला. या कालावधीत त्याची कोरोना चाचणीही केली होती. परंतु, अहवाल येण्यापूर्वीच रुग्णालयाने त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. मात्र, रविवारी त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  सदरचे प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी ठाणेकर करीत आहेत.


Popular posts
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image