अपघात टाळण्यासाठी कुञ्यांच्या गळ्यात रेडिअम बेल्ट
ठाणे:
रस्त्यावरील रेबिज आजार झालेला कुत्रा एखाद्या व्यक्तीला चावल्यास त्या व्यक्तीचा रेबिजने मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे या कुञ्यांना ‘अँण्टीरेबीजलस’ देण्याचा उपक्रम ‘पॉज’ या प्राणीमित्र संस्थेच्या मदतीने ठाण्याच्या पोखरण रोड क्रमांक दोन, लोकपुरम भागात घेण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाॅज या प्राणीमिञ संस्थेच्या मदतीने ठाण्यातील ५० हून अधिक भटक्या कुञ्यांना अँटीरेबिज लस देण्यात आली. राञीच्या अंधारात होणारे अपघात टाळण्यासाठी कुञ्यांच्या गळ्यात रेडिअम बेल्टही घालण्यात आले.
मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी हा उपक्रम हाती घेतला होता. यावेळी ‘पाॅज’चे संस्थापक निलेश भणगे व त्यांच्या टीमने कुञ्यांचे लसीकरण करतानाच त्यांच्या गळ्यात रेडिअमचे पट्टे घातले. या चमकणार् या पट्ट यांमुळे भटके कुञे गाडीसमोर येऊन होणारे अपघात टळतील, असे मत मनसे प्रभाग अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी व्यक्त केले.