संपूर्ण इमारत नाही तर केवळ ठराविक मजला सील करण्याचे आदेश


संपूर्ण इमारत नाही तर केवळ ठराविक मजला सील करण्याचे आदेश



ठाणे


ठाण्यातील झोपडपट्टी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ठामपाची चिंता अधिक वाढली आहे. त्यामुळे झोपडपट्टी भागात कोरोनाचा संसर्ग कसा आटोक्या त आणायचा असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.  झोपडपट्टीत हा प्रश्न गंभीर झाला असला तरी इमारतींमध्येही कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. एखाद्या इमारतीमध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर ती संपूर्ण इमारत सील करण्याबरोबरच 500 मीटर पर्यंतचा परिसर देखील सील केला जात होता. मात्र अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यामुळे मोठी गैरसोय निर्माण होत असल्याने आता ज्या इमारतीच्या मजल्यावर कोरोना बाधित रुग्ण सापडला आहे केवळ तेवढाच मजला सील करण्याचा नवा अध्यादेश ठाणे महापालिकेच्या वतीने काढण्यात आला आहे. झोपडपट्टीबाबत मात्र अद्याप कोणत्या ही प्रकारचे आदेश काढण्यात आलेले नाहीत.


त्यामुळे ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून यामध्ये अनेक इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. अनेक इमारतींमध्ये अत्यावश्यक सेवेत काम करणारे पोलीस, नर्स आणि इतर कर्मचारी असल्याने इमारत सील केल्यानंतर त्यांना बाहेर पडता येत नसल्याने नागरिकांना देखील मदत करण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे आता ठाणे महापालिकेच्या वतीने नवा अध्याद ेशात काढण्यात आला असून यामध्ये इमारतीच्या ज्या मजल्यावर रुग्ण सापडला असेल तोच मजला सील करण्यात येणार असून सोसायटीच्या इतर सदस्यांनी मात्र सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायचे असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी अध्याद ेशात नमूद केले आहे.