विकास रेपाळे यांच्या वतीने रोज सुमारे ७०० गरजू व गरीब नागरिकांना जेवण वाटप



विकास रेपाळे यांच्या वतीने रोज सुमारे ७०० गरजू व गरीब नागरिकांना जेवण वाटप

 


 

ठाणे

"कोरोना' मुळे लागू केलेली संचारबंदी व लॉकडाऊन काळात गरीब व गरजू लोकांसाठी शिक्षण समिती सभापती, नगरसेवक विकास रेेपाळे व वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले-जाधव यांच्या वतीने लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून जेवण वाटप करण्यात येत आहे. आजपर्यंत सुमारे २५ हजार लोकांना याचा लाभ मिळाला असल्याचे नगरसेवक विकास रेपाळे यांनी सांगितले.  लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार आहे.

 

ठाणे महापालिका प्रभाग क्र १९ मध्ये हातावर पोट असलेले अनेक नागरिक तसेच घोडागाडी चालक आहेत. व्यवसाय बंद आल्याने त्यांचे जेवणापासून हाल होऊ नये म्हणून शिवसेनेच्या वतीने जुन्या ज्ञानसाधना कॉलेज लगत असलेल्या ठाणे महापालिका शाळेत रोज सुमारे ७०० गरजू व गरीब नागरिकांना जेवण वाटप करण्यात येत  असून आता पर्यंत प्रभागातील सुमारे २५ हजार नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे . मानव सेवा हीच ईश्वर सेवा असे मानून शिवसेनेच्या माध्यमातून लॉकडाऊन संपेपर्यंत ही सेवा अविरत सुरू राहणार असल्याचे  रेपाळे यांनी यावेळी सांगितले.  "कोरोना' चा प्रसार रोखण्यासाठी 3 मे पर्यंत "लॉक डाऊन' चा निर्णय, तसेच कलम १४४ लावले असून संचारबंदी केली आहे. संचारबंदी आणि लॉक डाऊनमुळे प्रभाग क्र १९ मधील  शेकडो गरीब व गरजू लोकांच्या जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. हॉटेल, खानावळी बंद असल्यामुळे तसेच लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई केल्यामुळे गरीबांच्या जेवणासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे.