जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनक मात्र ११२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परत

जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनक मात्र ११२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परत


ठाणे



ठाणे जिल्ह्यात रुग्णसंख्या १० दिवसांत ५११ ने वाढली आहे. परिस्थिती चिंताजनक होत असतानाच या कालावधीत ११२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. ठाणे महापालिका हद्दीत १८३, नवी मुंबईत ११५, कल्याण डोंबिवलीत ७२ आणि मीरा-भा इंदरमध्ये ४७ नवे रुग्ण सापडले आहेत. लॉकडाउनचा दुसरा टप्पा संपत आला तरी ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्यामुळे चिंता वाढली आहे..


 १३ मार्चला  ठाणे जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण ठाणे महापालिका हद्दीत सापडला होता. तेव्हापासून २२ एप्रिलपर्यंत जिल्हाभरात ५०० कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यामध्ये १७ जणांचा कोरोना प्रादुर्भावाने मृत्यू झाला होता. तर ९६ जण ठणठणीत बरे होऊन कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर २३ ते २५ एप्रिलदरम्यान प्रतिदिन ४० ते ४५ रु ग्ण सापडले. पण,२६ एप्रिलला ७२ रुग्ण सापडले होते. त्यानंतर आठ दिवसांत चार वेळा ७० च्या पुढेच रुग्ण सापडल्यामुळे ही संख्या १० दिवसांत ५११ ने वाढून एकूण संख्या ही १०११ च्या वर पोहोचली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. दहा दिवसांत उल्हासनगरमध्ये ८, भिवंडीत ७, अंबरनाथ ४, बदलापूर १४ आणि ठाणे ग्रामीणमध्ये ११ रुग्ण वाढले आहेत. तर, दगावणान्यांची संख्या १२ ने वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.


कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे १२ नवे रुग्ण केडीएमसी हद्दीतील कोरोनाचे १२ नवे रुग्ण आढळले असून, त्यात पोलीस व सरकारी आरोग्य कर्मचारी आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १८१ झाली आहे. टिटवाळा पूर्वेतील ३९ वर्षांचा पोलीस, ३२ वर्षांचा पुरुष, २९ वर्षांची महिला आणि ५० वर्षांच्या महिला यांना कोरोना झाला आहे. तसेच मुंबईत कार्यरत असलेल्या व डोंबिवली पूर्वेत राहणा या ३३ आणि ५३ वर्षांच्या व्यक्तीलाही लागण झाली आहे. कल्याण पूर्वेतील ४३ आणि ३३ वर्षांच्या व्यक्तीलाही संसर्ग झाला असून, ते दोघे मुंबईत कार्यरत आहेत. कल्याण पूर्वेतील ३४ आणि पश्चिमेतील ३५ वर्षांच्या व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली आहे. ते दोघेही मुंबईतील सरकारी रुग्णालयात कार्यरत आहेत. याशिवाय कल्याण पश्चिमेतील ३६ वर्षांची व्यक्ती ही मुंबईतील खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यालाही कोरोना झाला आहे. एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ६० जणांना उपचारांती घरी सोडले आहे.