वैद्यकीय अधिकाऱीच कोरोनाच्या विळख्यात
ठाणे
ठाणे शहरात एकीकडे कोरोनाने थैमान घातले असताना यामध्ये पालिकेची आरोग्य यंत्रणा देखील सुटलेली नाही.छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात एकामागून एक वैद्यकीय अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडत असून आणखी एका निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याचा रिपोर्ट पॉझटिव्ह आला आहे. त्यामुळे ही संख्या आता 5 वर जाऊन पोचली आहे. मात्र अजूनही या रुग्णालयातील व्यवस्थापनाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे.
आतापर्यंत पॉझीटीव्ह आलेले सर्व वैद्यकीय अधिकारी हे मेडिसन विभागातील असून त्यांच्या संपर्कातील 9 वैद्यकीय अधिका:यांना माजीवडा येथे क्वॉरन्टाइन करण्यात आले आहे. यातीलच एका वैद्यकीय अधिका:याचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. मात्र असे असताना त्यांच्या संपर्कातील आणि क्वॉरन्टाइन करण्यात आलेल्या इतर 8 वैद्यकीय अधिकाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती केली जात आहे. यासाठी त्यांच्या क्वॉरन्टाइन सेंटरवर गाड्या देखील त्यांना घेऊन येण्यासाठी पाठवल्या जात आहे. त्यातही जर कामावर हजर झाले नाहीत तर जेवण देणार नाही याशिवाय वेतन रोखण्याच्या धमक्या देखील दिल्या जात असल्याची माहिती एका निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली आहे.