थायरोकेअर लॅबला ठाण्यात कोव्हीड 19 चे स्वॅब तपासणी करण्यास बंदी

थायरोकेअर लॅबला ठाण्यात कोव्हीड 19 चे स्वॅब तपासणी करण्यास बंदी असमाधानकारक कोविड चाचणी सुविधेबद्दल महापालिकेचा निर्णय


ठाणे


थायोरोकेअर लॅब या आयसीएमआरच्या अधिकृत प्रयोगशाळेत कोव्हीड 19 च्यास्वब तपासणीत 6 प्रकरणात चुकीचा अहवाल आढळल्याने या लॅबला ठाण्यात कोव्हीड 19 चे स्वॅब तपासणी करण्यास बंदी घालण्याचा आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिला आहे. ठाणे शहरात कोरोना कोव्हीड - १९ची प्राथमिकलक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांची कोव्हीड - १९ची तपासणी शासनमान्य प्रयोगशाळेकडेच करण्यात येते. थायोरोकेअर लॅब आयसीएमआरच्या अधिकृत प्रयोगशाळेच्या यादीमध्ये घोषित करण्यात आली होती. परंतु ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदरप्रयोगशाळेने दिलेल्या 6 प्रकरणांमध्ये चुकीचा अहवाल असल्याचे आढळून आले. यामुळे अनेक रूग्णांना सामाजिक आणि मानसिकत्रासातून जावे लागले होते.
त्यामुळे २२ मे २०२० पासून ठाणे महानगरपालिकाक्षेत्रातील संशयितांसाठी कोविड -19 स्वॅबगोळा करू नये असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. कोविडचाचणी बाबत असमाधानकारक सुविधा दिल्यामुळे महापालिकेच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.



Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image