मुंबई आणि पुण्यावर देखरेखीकरिता केंद्राकडून दोन विशेष सहमंत्रालयीन चमू

मुंबई आणि पुण्यातील  परिस्थितीवर देखरेखीकरिता केंद्राकडून दोन विशेष सहमंत्रालयीन चमू


मुंबई


राज्यात टाळेबंदीच्या कठोर अंमलबजावणीसाठी केंद्राकडून दोन विशेष सहमंत्रालयीन चमू पाठवले जाणार आहेत. हे चमू प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यातील करोनाच्या परिस्थितीवर देखरेख ठेवणार असून गरजेनुसार तातडीने विविध प्रकारचे निर्णयही घेईल. केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी या नव्या चमूंची घोषणा केली. पश्चिम बंगालमध्येही दोन चमू पाठवले जाणार असून त्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र आक्षेप घेतला आहे.


चमू पाठवल्या जाणाऱ्या राज्यांतील विविध हॉटस्पॉट जिल्ह्य़ांमध्येही लोकांनी टाळेबंदीचे उल्लंघन केल्याच्या व हिंसाचाराच्याही घटना घडल्या आहेत. शहरामध्ये वाहनांची ये-जा सुद्धा पाहायला मिळाली असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे हे चमू पाठवले जात असून या चमूकडून जागच्या जागी परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य प्रशासनाला निर्देश दिले जातील व त्यासंदर्भातील अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाईल. राज्यात पालघरमध्ये झालेल्या हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य सरकारकडून अहवाल मागितला आहे.


महाराष्ट्रामध्ये मुंबई व पुण्यातील तसेच, मध्यप्रदेशमध्ये इंदौर, राजस्थानमध्ये जयपूर, पश्चिम बंगालमध्ये तर सात जिल्ह्यांमध्ये स्थिती गंभीर बनू लागली आहे. लोकांकडून टाळेबंदी मोडण्याचे प्रकार झाल्याने या भागांमध्ये करोनाच्या प्रादुर्भाव वाढण्याचाही धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचेही काम चमूला करावे लागणार आहे. केंद्रातील अतिरिक्त सचिव स्तरावरील अधिकारी या चमूचा प्रमुख असेल, असेही केंद्रीय गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे.



Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image