जिवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने सामान्य ग्राहकांची कोंडी

 जिवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने सामान्य ग्राहकांची कोंडी


ठाणे



लॉकडाऊनचा वाढलेला कालावधी लक्षात घेऊन जिल्ह्यातील किराणा दुकानांवर मिळणारे कडधान्य, डाळी, अत्यावश्यक भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत.  दुकानदारांनी डाळी, तेल, साखरेचे भाव वाढवून सामान्य ग्राहकांची कोंडी केली आहे.डाळींच्या या चढ्या भावामुळे या कडक उन्हात उडदाचे पापड, करोडे, मूंगवडे आदी वाळवन करण्यासाठी गृहिणींना सध्याची भाववाढ डोकेदुखी ठरत आहे.


कोथिंबीर ची जुडी 50 ते 100 रुपयांस मिळत आहे. डाळी 100 ऐवजी 140 ते 150 रुपये किलोने देऊन दुकानदारांकडून ग्राहकांची मनमांनी लूट किली जात असल्याचे निदर्शनात आले.


दुकानदारांनी मूळ किंमती पेक्षा जास्त किंमत आकारु नये, मालाचा साठा करुन कृत्रिम तुटवडा करू नये,असे करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाने या आधीच दिला आहे. मात्र त्याचे पालन सुरू असल्याचे भासवल्या जात आहे. संचारबंदी आणि त्यात मालाचा होणाऱ्या कमी पुरवठ्याचे कारण पुढे करुन दुकानदार डाळी सारख्या अत्यावश्यक मालावर 50 टक्के वाढीव किंमत ग्राहकाकडून घेत असल्याचे वास्तव उघडकीस आले. कोरोनाच्या भीती दाखल नागरीक शुद्ध शाकाहारी भोजन करीत आहेत.


यातील पालेभाज्या आणि कडधान्य खरेदीवर भर देत आहेत. 40 रुपये मिळणारी भेंडी कमीतकमी 60 ते 80 रुपये किलो मिळत आहे. कांदा 25 ते 30, मिरची आधी 60 रुपये मिळणारी आता 130 ते 160 रुपये मिळत आहे. कडधान्याला या काळात आधी महत्व आले आहे. ग्राहकांकडून तूर, मूग, उडीद, मठ, चवळी, मसूर आदींच्या डाळी आधी केवळ सरासरी 25 रुपये पाव होत्या. आता कमीतकमी 35 रुपये पाव मिळत आहे. या वाढीव भावचा भडका ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या मध्यमवर्गीय ग्राहकांच्या तुलनेत उल्हासनगरच्या कामगार, कष्ठकरी, मजुरांमध्ये अधिक तीव्रतेने जाणवत आहे