मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब जनतेला नरेश मणेरा यांनी केली जेवणाची सोय




 


प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक नरेश मणेरा  यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील वाडयावस्तीतील मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब जनतेला लॉकडाऊन सुरु असल्यापासून जेवणाची सोय केली गेली. आज प्रभागातील गोरगरीब ३५० कुटुंबांना तांदूळ,गहू,तूरडाळ,कांदे,बटाटे चे वाटप करण्यात आले,या प्रसंगी विभागप्रमुख मुकेश ठोंबरे, उपविभागप्रमुख माया पाटील, शाखाप्रमुख जयवंत म्हात्रे,किशोर गुळवी,दत्ता मणेरा, सुधीर महमुंकर, सुनील मणेरा, डॉ.सुरेश भोसले,बाळू पाटील,भारत शेळके,कल्पेश पाटील,यश पाटील,विशाल तरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.