यंत्रमाग कारखान्यात कामगाराचा अज्ञात मारेकऱ्याकडून खून

यंत्रमाग कारखान्यात कामगाराचा अज्ञात मारेकऱ्याकडून खून



भिवंडी


शहरालगतच्या कारीवली येथील तलावाच्यापुढे एका यंत्रमाग कारखान्यात मेहता म्हणून काम करणाऱ्या कामगाराचा अज्ञात मारेकन्याने पाठीमागून धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना शनिवारी घडली आहे. अजित स्वयंकांत पटेल (47 रा.बालाजी नगर ,कारीवली) असे भोसकून हत्या झालेल्या यंत्रमाग कामगाराचे नाव आहे.


पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर कामगार भंडारी कंपाऊंड येथे कारखान्यात काम करीत होता. तो सकाळी कारखान्यातील लाईट बंद करण्यासाठी कारीवली तलावमार्गे रस्त्याने पायी निघाला होता. त्यावेळी तो तलावाच्या पुढे असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात मारेकयाने त्याच्या पाठीत धारदार शस्त्र खुपसल्याने ते थेट हृदयात वर्मी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.


या हत्येप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) नरेश पवार हे करीत आहेत.


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image