अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सापडले जिल्ह्यात सर्वाधिक ७१ रुग्ण 

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सापडले जिल्ह्यात सर्वाधिक ७१ रुग्ण 



ठाणे 


जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात जास्त ४६ रुग्ण १३ एप्रिल रोजी आढळून आले होते. त्यानंतर बरोबर १३ दिवसांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तदिनी सर्वाधिक ७१ रुग्ण  सापडल्याने कोरोनाचे संकट आणखी भीषण झाले आहे. यामध्ये सर्वाधिक २० रुग्ण हे नवी मुंबईत सापडले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. नव्या ७१ रुग्णांमुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ७00 कडे सरकत आहे. कल्याण-डोंबिवलीत आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये पोलीस, पत्रकार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. 


नवी मुंबईत रविवारी २० रुग्ण आढळून आले असून त्यापाठोपाठ ठामपा आणि मीरा-भा इंदर येथे प्रत्येकी १७, केडीएमसी-१२, भिवंडी-२, अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे ग्रामीण येथे प्रत्येकी एक रुग्ण मिळून आला आहे. उल्हासनगर येथे रविवारी एकही रु ग्ण सापडलेला नाही. वाढलेल्या रुग्णांमुळे ठामपातील एकूण रुग्णसंख्या २२६ झाली आहे. केडीएमसी-१२९, भिवंडी-११, अंबरनाथ-५, उल्हासनगर-२, बदलापूर-१७, मीरा-भाः इंदर-१४६, नवी मुंबई-१३१, ठाणे ग्रामीण-१८ असे जिल्ह्यात एकूण ६८६रुग्ण आजवर झाले आहेत.  नवी मुंबईतील ४२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू २२ एप्रिलला ठामपाच्या कळवा रुग्णालयात झाला. कोरोना अहवाल रविवारी आल्याने त्याच्या मृत्यूची नोंद रविवारी करण्यात आली. या रुग्णामुळे नवी मुंबईतील मृत रुग्णांची संख्या पाच झाली असून, जिल्ह्यातील मृतांची संख्या २० झाली आहे


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image