पायाभूत सुविधांमध्ये समाविष्ट कामास परवानगी- राजेश नार्वेकर

पायाभूत सुविधांमध्ये समाविष्ट कामास परवानगी- राजेश नार्वेकर



ठाणे 


जिल्ह्यातील पायाभूत सुविधांमध्ये समाविष्ट असलेली कामे करणे आवश्यक असल्याने, आरोग्य सुविधेच्या अटींच्या अधीन राहून अनेक कामे सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने जिल्ह्यातील पावसाळ्या पूर्वीची कामे आता मार्गी लागणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत आपत्कालीन परिस्थितीत बंद ठेवण्यात आलेल्या आस्थापना १४ एप्रिलपर्यंत बंद राहतील.मात्र रस्ते,वीज,पाणी,दूरसंचार यंत्रणा,जलनिस्सारण,इंटरनेट आदी कामे करण्यास परवानगी देण्यात आली आहे.


जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग,तसेच राज्य व प्रमुख महामार्गांची कामे व पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे,ग्रामीण रस्ते,प्रधानमंत्री सडक योजने अंतर्गत रस्ते, महावितरण व महापारेषण आणि महावीजनिर्मिती,इतर विद्युत विषय विभागाकडील विजेचे खांब टाकणे,विजेची दुरुस्ती, भारत संचार निगम लिमिटेड आणि इतर दूरसंचार कंपनीच्या दूरसंचार व इंटरनेट सेवा संचालन, लाइन मेंटेनन्स,कामे तसेच पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण आणि स्वच्छतेची कामे सध्याची आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता,ही सर्व कामे तत्काळ पूर्ण होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा कोलमडून नये,यासाठी हे काम करणाऱ्या व्यक्तींनी प्रशासनाच्या आदेशाची प्रत तसेच कार्यलयाचे ओळखपत्र सोबत ठेवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image