कळव्यातील १२ तर मुंब्य्रातील ३८ इमारतीं कुलूप बंद

कळव्यातील १२ तर मुंब्य्रातील ३८ इमारतीं कुलूप बंद



ठाणे


महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ३३ करोनाबाधित आढळून आले असून त्यापैकी २१ रुग्ण कळवा-मुंब्रा भागातील आहेत. महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत करोनाबाधित रुग्णांच्या परिसरातील ५० इमारतींचे प्रवेशद्वार कुलूप लावून बंद केले. त्यामध्ये कळव्यातील १२ तर मुंब्य्रातील ३८ इमारतींचा समावेश आहे. कुलूप बंद इमारतीमधील रहिवाशांना शक्य तितके साहित्य घरपोच देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे महापालिका उपायुक्त मनीष जोशी यांनी सांगितले..


या भागातील करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात असून त्याचाच एक भाग म्हणून तीन दिवसांपूर्वी हे दोन्ही परिसर पूर्णपणे टाळेबंद करण्यात आले. औषधालये वगळता सर्वच दुकाने बंद करण्यात आली आहेत. या पाश्र्वभूमीवर स्थानिक आमदार आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी सकाळी एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये कळवा आणि मुंब्रा परिसरात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांचे परिसर पूर्णपणे टाळेबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कळवा आणि मुंब्रा परिसर गेल्या तीन दिवसांपासून पूर्णपणे टाळेबंद करण्यात आले असतानाही याठिकाणी अनेक नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. अशा नागरिकांना रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी, महापालिका आणि पोलीस प्रशासनाने आता इमारतींचे प्रवेशद्वार कुलूप लावून बंद करण्याचा निर्णय शुक्रवारच्या बैठकीत घेतला असून त्यानुसार या दोन्ही भागांतील करोनाबाधित रुग्णांच्या परिसरातील ५० इमारतींचे प्रवेशद्वार कुलूप लावून बंद करण्यात आले आहेत. तसेच या दोन्ही भागांतील सर्वच इमारतींचे प्रवेशद्वार कुलूप लावून बंद करण्याची सूचना इमारतीच्या पदाधिकाऱ्यांना केली आहे.


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image