कोरोना रुग्णालयाकरिता मदतीचे आवाहन

कोरोना रुग्णालयाकरिता मदतीचे आवाहन




उल्हासनगर



 कोरोनाचे वाढता प्रभावामुळे आता उल्हासनगरातही कोवीड हॉस्पिटल सुरु करण्यात आले आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर ४ मधील शासकीय प्रसूतिगृहाचे रूपांतर आता कोविड १९ च्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी करण्यात आले आहे. मात्र यासाठी आवश्यक तांत्रिक व वैद्यकीय साहित्य आणि आर्थिक बळाकरिता मनपा आयुक्तांनी येथील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.  रुग्णालयाकरिता वैद्यकीय खर्च तसेच आणखी वेंटिलेटर मशीन, वेगळ्या किट्स व आर्थिक भार जनतेने लोकसहभागातून उभा करावा. त्याकरिता ' कोविड - १९ सॉलीडर्टी रिस्पॉन्स डोनेशन' नावाने मनपाने बँकेचे खाते उघडले असून त्यात नागरिकांनी यथाशक्ती देणग्या अथवा वैद्यकीय साहित्याच्या माध्यमातून योगदान देण्यासाठी शहरातील सामाजिक संस्था, व्यापारी व नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. 
आता या कोविड रुग्णालयात कोरोना विषाणूची लक्षणं आढळलेल्या रूग्णांच्या सर्व तपासण्या येथेच करण्याची यंत्रणा उभी केली आहे. त्यातून निष्पन्न झालेल्या रुग्णांना केईएम किंवा कस्तुरबा याठिकाणी उपचाराकरिता पाठवण्यात येणार आहे. याआधी ही उपचार व्यवस्था उल्हासनगरात उपलब्ध नसल्याने संशयित रुग्णांना मुंबईच्या रुग्णालयांमध्ये तपासणीकरिता पाठवावे लागत होते. परंतु आता ती लांबलचक गैरसोय टळेल.. यासाठी रुग्णालयात निर्जंतुक करून घेतले आहे. यात दोन व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध असून तीन नवीन खरेदी करण्यात आले आहेत.
उल्हासनगरात एकही कोरोना चा रुग्ण नाही. आणि शहरातील थायरासिंग दरबार, अमृत वेल, राधास्वामी सत्संग यासारख्या सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्ते हजारो गरीबांना अन्न व जिवनावश्यक वस्तू वितरीत करीत आहेत. ही समाधानाची बाब आहे. परंतु, भविष्यातील संभाव्य धोके ओळखून कोरोना शी झुंजण्यासाठी या कोविड रुग्णालयाची गरज म्हणून मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात करायचा निर्णय घेतला आहे. त्या पद्धतीने शासकीय प्रसुती रुग्णालयातील मुले, प्रसूत माता व इतर रुग्ण हे मध्यवर्ती रुग्णालय कँप ३, व सेंचुरी रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले आहेत. तेथे त्यांची काळजी घेतलीजाणार असल्या बाबतही आयुक्तांनी आश्वस्त केले आहे. 


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image