भातसा धरणातील पाण्याच्या पातळीत मागील वर्षापेक्षा ९.१९ टक्के वाढ

भातसा धरणातील पाण्याच्या पातळीत मागील वर्षापेक्षा ९.१९ टक्के वाढ

 


 

ठाणे


 


मुंबईला दररोज पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची पातळी वाढल्याने मुंबईकरांना या वर्षी पाणी समस्येला सामोरे जावे लागणार नसून त्यांना पाणी संकटाला तोंड द्यावे लागणार नसल्याचे चिन्ह दिसत आहे. चालू वर्षी चांगला पाऊस झाल्याने भातसा धरणात जास्त पाणी साठा आहे. मार्च उलटून एप्रिल निम्मा महिना संपत आला तरी  धरणाच्या पाण्याची पातळी चांगली आहे. गुरुवार दिनांक १६ एप्रिल २०२० रोजी  प्रतिनिधीने भातसा प्रकल्प अधिकाऱ्यांशी  संपर्क केला असता  दिनांक १६ एप्रिल २०१९ च्या तुलनेत आजची पाण्याची पातळी ९.१९ टक्के ने वाढल्याची  माहिती समोर आली आहे.

 

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याच्या भातसा धरणातून प्रतिदीन  २००० एमएलडी पाणी मुंबई व ठाणे महानगराला दिले जाते या धरणाची लांबी ९५९ मीटर असून तळपायापासून उंची ८९  मीटर आहे तसेच एकुण जलसंचय ९७६ .१० दशलक्षघनमिटर आहे. तसेच धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चोरस किलोमिटर आहे. भातसा धरणाला जोडलेला उजवा तिर कालवा ६७ किलोमिटर आहे. तर डावा कालवा ५० किलोमिटर आहे.  

                 गेल्या वर्षी भातसा धरण क्षेत्रात एकूण २०९२.०० मिली मीटर पर्जन्यमान झाले होते. त्यावेळी  धरणाच्या पाण्याची पातळी ११६.२२ मीटर होती. पाणी साठा ३८४.८६८ दश लक्ष घण मीटर होता. तर यावर्षी चांगल्या पावसामुळे हे पर्जन्यमान ४३२७ एवढे झाल्याने धरणाच्या पाण्याची पातळी आज मितीस १२१.३१ मीटर झाली आहे.  तर पाणी साठा ४७१.३९३ दश लक्ष घण मीटर झाला असल्याने हे प्रमाण गेल्या वर्षा पेक्षा ९.१९ टक्क्यांनी वाढले  आहे. त्यामुळे चालू वर्षी मुंबईकरांना पाणी संकट भेडसावणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. 

 

 

Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image