सिगारेट आणि तंबाखू न दिल्याने दुकानदारास जबर मारहाण

सिगारेट आणि तंबाखू न दिल्याने दुकानदारास जबर मारहाण



ठाणे :


कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीसह दारुची दुकानेही सध्या बंद आहेत. अशी दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर पोलिसांकडून साथ प्रतिबंधक कायदा कलम १८८ नुसार कारवाई देखिल केली जात आहे. असे असूनही कळवा, गांधीनगर येथील राणा टॉवर भागातील बकुल या किराणा व्यापा याला पुजारी याच्यासह तिघांनी आपण पोलीस असून आम्हाला सिगारेट आणि तंबाखू दे, असे म्हणत त्याला दुकान उघडण्यास भाग पाडले.आमच्या दुकानात सिगारेट आणि तंबाखू नसल्याचे बकुल यांनी सांगितल्यानंतरही त्यांना तसेच त्यांचा मुलगा अंकेश याला या तिघांनी जबर मारहाण केली. हा प्रकार १२ एप्रिल रोजी रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास घडला. कहर म्हणजे त्यांच्यापैकीच एकाने या दुकानातील काही रोकडही घेतल्याचा आरोप अंकेश यांनी केला आहे. रात्री कळवा पोलिसांना पाचारण करुन दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर त्यांचा तिसरा साथीदार मात्र पसार झाला होता. त्यालाही नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुळात संचारबंदीच्या काळात सिगारेट विक्री करणाऱ्यांवर जर साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू केला जात असेल तर सिगारेट मागण्यासाठी दुकान उघडण्यास भाग पाडणा या पोलिसांविरुद्धही तीच कलमे लावली जावीत, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहेत.


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. गरजेच्या वस्तू पुरवण्याची जबाबदारी अनेक संस्था संघटनांनी घेऊन याला हातभार लावला आहे. लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांना पोलिस प्रशासनाकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यातच  मुंब्रा पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांसह तिघांनी कळव्यातील गांधीनगर येथील एका किराणा विक्रेत्याकडे सिगारेटची मागणी करण्यात आली. ती न दिल्याने बकुल परमार (३२) आणि अंकेश परमार (१२) या पिता पुत्राला मारहाण करुन बघून घेण्याची धमकी देण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी कुमार पुजारी (३२, रा. मुंब्रा), मंदार कांबळे या दोन पोलिसांसह विशाल बिराडे या रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.


 


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image