ठाणे शहरात सर्वच ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्याचा निर्णय

ठाणे शहरात सर्वच ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्याचा निर्णय



ठाणे :


राज्यात २४ मार्चपासून संचारबंदी लागू झालेली आहे. तेंव्हापासून ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांच्या परिसरामध्ये स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. अनेक ठिकाणी गृहरक्षक दलाचीही मदत घेण्यात आली आहे. तरीही बहुतांश भागांमध्ये नागरिक अगदी क्षुल्लक कारणांसाठी घराबाहेर पडत आहेत. तेव्हा मुंब्यापाठोपाठ आता भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, ठाणे शहर आणि राबोडी या सर्वच ठिकाणी राज्य राखीव पोलीस दला च्या चार  कंपन्या तैनात करण्याचा निर्णय ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी घेतला आहे.


अनेकदा घरातील किरकोळ सामान आणण्याचे तसेच घरातील व्यक्ती आजारी असल्याची कारणे दिली जात आहेत. अनेकदा केवळ फेरफटका मारण्यासाठीही नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र अनेक ठिकाणच्या नाकाबंदी दरम्यान पहायला मिळत असल्याचे पोलीस सांगतात.


वागळे इस्टेट, मुंब्रा आणि राबोडी या भागात वारंवार पोलिसांची गस्त असूनही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे आढळले. अखेर पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी केलेल्या मागणीनंतर मुंब्रा भागात २९ मार्च पासून राज्य राखीव दलाची एक संपूर्ण कंपनी (एका कंपनीमध्ये तीन प्लाटून्स असतात. एका प्लाटून्समध्ये २५ ते ३० सशस्त्र पोलीसांची संख्या असते.) तैनात केली आहे.


३१ मार्च पासून भिवंडीतही एक कंपनी, उल्हासनगर आणि कल्याण या दोन शहरांसाठी एक स्वतंत्र कंपनी तर राबोडी, ठाणे शहर आणि कळवा या विभागांसाठी तीन प्लाटून्स आहेत. तसेच वागळे इस्टेटसाठी एक प्लाटून्स तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image