चालू महिन्यातच सर्वांना धान्य पुरवठा करण्यात यावा
नगरसेवक कृष्णा पाटील यांची मागणी
ठाणे
कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. कामधंदा बंद असल्यामुळे सद्य परिस्थितीत सर्वांनाच अन्नधान्याची गरज आहे. तरी एप्रिल महिन्यापासूनच सर्व रेशनकार्ड धारकांना व आधारकार्ड लिंक नसलेल्यांना देखील धान्य पुरवठा करण्यात यावा अशी मागणी नगरसेवक कृष्णा पाटील राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक प्रश्न राज्यातील जनतेसमोर प्रामुख्याने शेतकरी, कष्टकरी, कामगार, निराधार या घटकांसमोर निर्माण झाले आहेत. सर्वांनाच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
शासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार मे व जून महिन्यात केसरी व पांढरे रेशनकार्ड, रेशनकार्ड नसलेल्या आणि आधारकार्ड लिंक नसलेल्या नागरिकांना धान्य पुरवठा करण्यात येणार आहे. परंतु तसे न करता एप्रिल महिन्यातच सर्वांना धान्य पुरवठा करण्यात यावा तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना केंद्र सरकारने मोफत धान्य पुरवठा करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे, त्याची देखील लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी अशी विनंती नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केली आहे.