शाळेची फी जमा करण्यात सूट देण्यात यावी - मनसे

शाळेची फी जमा करण्यात सूट देण्यात यावी - मनसे



 ठाणे :


कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबंदीच्या कालावधीमध्ये शाळेची फी जमा करण्यात सूट देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सांस्कृतिक विभागाच्या ओवळा माजिवडा विधानसभा संघाचे अध्यक्ष प्रसाद भांदिगरे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.


जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये भांदिगरे यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात अनेक पालकांना आपल्या पाल्यांच्या शाळेची फी भरण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे चालू आणि आगामी वर्षांसाठी म्हणजेच २०१९-२०२० आणि २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षामध्ये फी भरण्याचा कालावधी वाढवून देण्यात यावा.


लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी आणि पालकांकडील पैशांची उपलब्धता ही तुटपुंजी असेल. त्यामुळे माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच सर्व मंडळांच्या शाळा व्यवस्थापकांनी पालकांकडून चालू वर्षांची आणि आगामी वर्षांची फी गोळा जमा करताना सहानुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. संचारबंदीच्या काळात फी जमा करण्याची सक्तीही केली जाऊ नये. संचारबंदी पूर्णपणे शिथिल झाल्यानंतरच फी घ्यावी. राज्य शासनानेही यावर शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना आदेश काढण्यात यावेत, असेही भांदिगरे यांनी म्हटले आहे.


जिल्हाधिका यांसह ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी,ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनाही हे निवेदन देण्यात आले आहे.


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image