जन्माला आलेल्या  बालकांची विशेष काळजी घेण्यासाठी रुग्णालयामध्ये स्वतंत्र कक्ष

 जन्माला आलेल्या  बालकांची विशेष काळजी घेण्यासाठी रुग्णालयामध्ये स्वतंत्र कक्ष



बदलापूर


बदलापुरात कोरोनाचे १४ रुग्ण आढळल्यानंतर येथील यंत्रणा सावध झाली आहे. काही रुग्णालयामध्ये जन्माला आलेल्या  बालकांची विशेष काळजी घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारले आहेत. बालकाचा जन्म होताच बाळाच्या संपर्कात त्याच्या आईशिवाय इतर कोणतेही नातेवाईक येणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे.


बदलापुरातील साईकृपा रुग्णालयातील डॉ. भारती चॅटर्जी आणि डॉ. जॉयदिप चॅटर्जी यांनी आपल्या रुग्णांची योग्य सुरक्षा राखण्याचे काम केले आहे. डॉ. भारती यांच्या रुग्णालयात जन्माला आलेल्या नवजात बालकांची योग्य काळजी घेत आहे. त्यांच्याकडे नोंदणीकृत रुग्णांवरच उपचार केले जातात. लहान बालकांना इतरांचा त्रास होणार नाही याकडे विशेष लक्ष दिले जाते. नवजात बालकाला कोरोनाचा धोका होणार नाही यासाठी खास यंत्रणा उभारली आहे. या रुग्णालयात जन्माला आलेल्या बाळाला आणि त्याच्या आईची निगा राखण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यांच्या व्यतिरीक्त इतर कोणालाही बालकाजवळ जाऊ दिले जात नाहीत. बाहेरील व्यक्ती आल्यावर बाळाला तात्पुरत्या स्वरुपात मास्क लावले जाते. मास्क असे लपर्यंत त्या बाळाजवळ नर्सला ठेवण्यात येते. एवढेच नव्हे तर बाळाच्या आईला देखील मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. बाळाचे इतर नातेवाईकांना जवळ जाण्यास मज्जाव घालण्यात येत आहे. बाळाच्या आणि बाळाच्या आईच्या सुरक्षेसाठी या अटी घालण्यात आल्या आहेत. बाळ आणि आईला स्वतंत्र कक्षातच ठेवण्यात येते. बाळाला  मास्क लावल्यास त्याला श्वास घेण्यास  अडचणी येऊ शकतात, त्यामुळे त्याला मास्क लावला जात नाही, तथापि बाळाच्या संपर्कात इतर कोणी येणार नाही याची काळजी घेतली जाते. तसेच बाळाची आणि बाळाच्या आईवर उपचार करणारे नर्स हे देखील योग्य दक्षता घेऊनच त्यांच्या संपर्कात येत असल्याने  त्यामुळे लहान बालकांवरील धोका कमी होण्यास मदत होत असल्याचे डॉ. भारती चॅटर्जी यांनी सांगितले.


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image