तर वाहतूक कोंडी कायम

तर वाहतूक कोंडी कायम



ठाणे 
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कोपरी आनंदनगर येथील काम सुरू असलेले रेल्वे ओव्हरब्रिज आणि कळवा खाडीवरील पुलाचे कामही थांबले आहे. मात्र जर हे काम वेळेत पूर्ण झाले नाही तर येणाऱ्या पावसाळ्यात प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.  याबाबत प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत अनेक वाहतुकदारांनी व्यक्त केले आहे. 
 सध्या देशभरात पसरलेल्या कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन केले आहे. प्रत्यक्ष १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असले तरी तिचा कालावधी अजून किती वाढेल की नाही याबाबत काही सांगता येत नाही. परंतु या महामारीमुळे संकटात सापडलेल्या लोकांना २ महिन्यावर आलेल्या पावसाळ्यात आणखी बऱ्याच संकटाना सामोरे जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. ठाण्यात मोठया प्रमाणात विकासकामे सुरू होती. यात प्रामुख्याने मेट्रोचे काम, कोपरी आनंदनगर येथील रेल्वे ओव्हरब्रिज, कळवा खाडीवरील होणारा पूल आनंदनगर आणि कलवा पल रखडल्यास पावसाळ्यात होणार प्रचंड वाहतूक कोंडी , याशिवाय शहरात होत असलेली रस्त्यांची कामे या संचारबंदीमुळे बंद ठेवण्यात आली आहेत. 
खरेतर या पावसाळ्यापूर्वी यातील बरीचशी कामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मनोदय होता. परंतु या महामारीच्या संकटामुळे आता ठाणेकरांना येत्या पावसाळ्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही दक्षता घेणे क्रमप्राप्त आहे. जर का हे कोरोनाचे संकट अजून लांबणीवर पडले तर मात्र नागरी समस्यां वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.