ठाणे महानगरपालिकेच्या निर्मला देवी दिघे रुग्णालयाच्या परिचारिका, प्रसाविका, आशा वर्कर, ठामपा चे शिक्षक, पाणी खात्यातील कर्मचारी व आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी मिळून ४८ जणांच्या ग्रुप तर्फे प्रत्येक दोन जणांच्या टीम रोज १०० घराघरात जाऊन सर्दी ताप,खोकला सदृश्य आजार व संशयीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची तपासणी करत आहेत. यात कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील म्हणजे अतिजोखमीच्या व्यक्तींना घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा येथे ठेवण्यात येते तर कमी जोखमीच्या व्यक्तींची आवश्यक तपासणी करून त्यांना घरातच इलाज करून विलगीकरण करण्यात येत आहे.