वेदांत हॅास्पीटलमध्ये मिळणार 125 खाटांची अतिरिक्त सुविधा

वेदांत हॅास्पीटल आता कोव्हीड हॅास्पीटल म्हणून अधिगृहित


महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचा निर्णय


125 खाटांची अतिरिक्त सुविधा मिळणार


 



ठाणे


ज्या कोरोना बाधीत रूग्णांना खासगी रूग्णालयात उपचार घेण्याची इच्छा आहे अशा रूग्णांसाठी आता घोडबंदर रोडवरील वेदांत हॅास्पीटल हे कोव्हीड हॅास्पीटल म्हणून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घोषित केले आहे.       ठाणे महानगरापालिका क्षेत्रामध्ये रूग्णांना उत्तम वैद्यकिय सुविधा मिळाव्यात यासाठी महापालिका आयुक्तांनी यापूर्वी होरायझन हॅास्पीटल (50 खाटा), जिल्हा सामान्य रूग्णालय (278 खाटा) या व्यतिरिक्त कोरोना संशंयित रूग्णांसाठी बेथनी हॅास्पीटल (50 खाटा) अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.       त्यानंतर आता वेदांत हॅास्पीटलही अधिगृहित केले असून तिथे कोव्हीड रूग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.


      सदरचे हॅास्पीटल तेथे उपलब्ध असलेल्या वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी आणि सर्व सुविधांसह अधिगृहित करण्यात आले असून सदरचे हॅस्पीटल कोव्हीड हॅास्पीटल म्हणून घोषित केल्याने या ठिकाणी एकूण 125 अतिरिक्त खाटांची सुविधा प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर 15 खाटांचे आयसीयू युनिट, 5 व्हेंटिलेटर्स, 12 सिंगल रूम्स, 12 डबल रूम्स यासह 20 मॅनिटर्स आणि 22 सिरींज पम्पस् आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत.