वागळे इस्टेटमधील त्या ११० जणांचा शोध घेण्याची सुरवात

वागळे इस्टेटमधील त्या ११० जणांचा शोध घेण्याची सुरवात



ठाणे :


मंगळवारी सांयकाळी पालघर भागातील सफाळे येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. सदरचा व्यक्ती हा ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील एका खाजगी कंपनीत कामाला होता. परंतु आता त्याच्या मृत्युमुळे या कंपनीत काम करणाऱ्या सर्वांचाच शोध सुरु झाला आहे.  त्याच्या संपर्कातील आता ११० जणांचा शोध घेण्याची सुरवात ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. महापौर नरेश म्हस्के यांनी पालिकेला या ११० जणांची यादी दिली असून ते सर्वजण ठाण्याच्या विविध भागात वास्तव्यास असल्याची माहिती समोर येत आहे. तर यातील काही कामगार हे नवी मुंबई, तर काही कामगार मुलुंड या भागातील असल्याची माहितीही समोर येत आहे.


 सदर पालघर येथील व्यक्ती ही १७ मार्च पर्यंत कामाला येत होता, अशीही माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे ठाण्यात ही माहिती समजताच महापौर म्हस्के यांनी संबधीत कंपनीतील कामगारांची यादी मागवून घेतली असून ती पालिकेच्य स्वाधीन केली आहे. या यादीत ११० जणांचा समावेश असून आता त्यांचा शोध घेण्यासाठी पालिकेने टीम तयार केल्या आहेत. हे ११० कामगार ठाण्यातील हाजुरी, कळवा, किसननगर, पोखरण रोड.२, अंबिका नगर, आनंद नगर, वागळे इस्टेट आदींसह इतर भागात वास्तव्यास असून आता त्यांचा शोध सुरु झाला आहे. तर काही कामगार हे नवीमुंबईतील तर काही नाहुर, मुलुंड भागातील असल्याची माहितीही महापौरांनी दिली. त्यातील बहुतेक कामगार हे झोपडपटटी भागात राहणारे असल्याने आता पालिकेची या सर्वांना शोधण्यासाठी तारेवरची कसरत सुरु झाली आहे.


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image