तेंडुलकर क्रीडा संकुल ठाणे येथे दशावतार नाटक महोत्सव 

तेंडुलकर क्रीडा संकुल ठाणे येथे दशावतार नाटक महोत्सव 



ठाणे 
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने  तेंडुलकर क्रीडा संकुल ठाणे येथे दशावतार नाटक महोत्सव २०१९-२० या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम  ७ मार्च पर्यंत रोज सांयकाळी ६.३०वाजता सुरु होणार आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गटनेता ठाणे म. न. पा. दिलीप बारटक्के, ठामपा उपमहापौर पल्लवी कदम, अध्यक्ष महाराष्ट्र हौसिंग फेडरेशन सिताराम राणे, नगरसेवक दशरथ पालांडे, माजी महापौर प्रमोद राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. 
ज्ञान व आकलन शास्त्रशुद्ध पद्धतीने नवीन पिढीला व्हावे यासाठी दशावतार कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. दशावतार ही महाराष्ट्रातील फार जूनी लोककला या कलेचे जतन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ठाणे महापालिका उप महापौर पल्लवी कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उप महापौर म्हणाल्या की, दशावतार ही लोककला भविष्यकाळात टिकून राहावी व या कलेची जोपासना व्हावी या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाकडून लोककला जपण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन त्यांनी शेवटी केले. 



Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
कचरावाहक घंटा गाडीमधून डिझेल चोरी केल्याप्रकरणी केडीएमसीच्या एका कंत्राटी घंटागाडी चालकाला अटक करण्यात आली आहे.
Image
कलियुगातील संजीवनी मुंबईत आली; कोरोना लसीच्या वितरणासाठी BMC सज्ज: महापौर
Image