नोंदणीकृत रूग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने बंद राहिल्यास होणार कारवाई

नोंदणीकृत रूग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने बंद राहिल्यास होणार कारवाई: महापालिका आयुक्त विजय सिंघल



ठाणे


ठाणे शहरामध्ये कोरोनाचा प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने तसेच सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य विषयक सेवा देणे अतिशय महत्वाचे असून जी नोंदणीकृत रूग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने तसेच संबंधित आरोग्य विषयक खाजगी आस्थापना बंद राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.
      साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १९८७ ची राज्यात अंमलबजावणी सुरू असून या अधिनियमान्वये कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महापालिका आयुक्त हे सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.           या अधिनियमांतील तरतुदींद्वारे प्रदान केलेल्या अध्काराचा वापर करून श्री. सिंघल यांनी ठाणे शहरातील नोंदणीकृत रूग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने तसेच संबंधित आरोग्य विषयक खाजगी आस्थापना बंद राहिल्याचे निदर्शनास आल्यास त्या आस्थापनांचे परवाने रद्द करण्याबरोबरच त्यांचेवर भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image