ठाणे शहरामध्ये दोन अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने होणार निर्जंतुकीकरण

ठाणे शहरामध्ये दोन अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने होणार निर्जंतुकीकरण
अहमदाबादवरून मागविली दोन वाहने



ठाणे


 ठाणे शहरामध्ये निर्जंतुकीकरणाची फवारणी प्रभावीपणे करता यावी यासाठी महापालिकेने अहमदाबादवरून दोन अत्याधुनिक वाहने मागविण्यात आली असून आता महापालिकेच्या ताफ्यात असलेल्या यंत्रणेबरोबरच या वाहनाच्या साहाय्याने निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येणार आहे. 


 या यंत्राच्या माध्यमातून एकाचवेळी 40 फुटाचा रस्त्याची फवारणी करता येवू शकते. या वाहनाची गतीही पाच मिनिटाला एक किमी एवढी असल्याने जास्तीत जास्त क्षेत्रफळामध्ये फवारणी करता येणार आहे. ही दोन वाहने शहराच्या विविध भागामध्ये फवारणी करतील. त्याचबरोबर या वाहनांसोबत 10 ट्रॅक्टर्स, 10 टँकर्स, 10 बोलेरो, 5 टाटा एस आणि 125 हातपंपाच्या माध्यमातूनही फवारणी करण्यात येत आहे. 


 शहरातील मोठ्या रस्त्यांवर या वाहनांच्या माध्यमातून सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी करण्यात येणार असून छोट्या-छोट्या गल्ल्यांमधून छोट्या वाहनांच्या माध्यमातून फवारणी करण्यात येत आहे.