गुटखा व तंबाकुजन्य पदार्थांची वाहतुक करण्या-या आरोपींना अटक
२३,१४,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
ठाणे : दि. ०१/०३/२०२० रोजी ०१.३० वाजताचे सुमारास कासा पोलीस ठाणे हद्दीत मुंबई अहमदाबाद महामार्ग क्र. ८ वर मौजे आबोली गावचे हद्दीत पटेल हॉटेल येथे आरोपीत ) सलीम ततासीम आलयी वय २९ वर्षे रा. फत्तेपुर बाधोता.बेट जि.सारंगपुर राज्य युपी २) सोनु रामनिवास बुरा वय २९ वर्षे रा..बधावार जि.हिसार राज्य हरीयाणा यांनी आपसात संगणमत करुन आपल्या ताब्यातील ट्रक क्र. एच आर ३८ वाय २४८७ यात माल मानवी आरोग्यास अपायकारक आहे व त्यावर महाराष्ट्र शासनाने अधिसुचनाद्ववारे वाहतुकीस / विक्रीस प्रतिबंध केलेला आहे हे माहीत असतानाही शासकीय आदेशाची अवहेलना करुन विक्री करण्यासाठी वाहतुक करुन घेवुन जात असताना मिळून आले. आरोपीत यांचे ताब्यातुन ७,५६,०००/-रु.कि. शुद्ध प्लस पान मसाल्याचे ४२०० पाऊच, २) ७,५६०/- रु. कींमतीचे राजश्री पान मसाल्याचे ४५ पॅकेट, २) २,७००००/- रु. एस. प्लस तंबाखुचे ९,०००/- पॅकेट, ३) ७४,८००/- रु. कींमतीचे विमल पान मसाल्याचे ४०० पॅकेट, ४) १३,२००/- रु. कींमतीचे व्ही. -२ टॉबॅकोचे ४०० पॅकेट, ५) १२,००,०००/- रु. कि. एक नारंगी रंगाचा कंटेनर ट्रेलर त्यास पाठीमागील व पुढील बाजुला एच. आर. ३८ वाय. २४८७ अशी नंबर प्लेट असलेली जू. वा.की.सु. असा एकुण २३,१४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीत यांचे विरुध्द कासा पोलीस ठाणे गु.र.नं. ५१/२०२० भा. दं. वि. सं. कलम ३२८,१८८, २७२, २७३ सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे नियम व नियमने २०११ चे कलम २६ (२) कलम २३, तसेच कलम २६ (२) (iv) सहवाचन कलम ३० (2) (a) Regulation No. 2.3.4 of Food Safety & Standards (Prohib ition and Restrictions on Sales) Regulations 2011, सहवाचन Regulation No.3.1.7 of Food Safety & Standards (Food Products Standards and Food Additives) Regulations 2011, शिक्षा कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी यांना दिनांक ०४/०३/२०२० रोजी अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई सहा. पोलीस निरीक्षक आनंदराव काळे, कासा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.