आयुष्मान योजनेअंतर्गत कोरोना व्हायरसवरील उपचार समाविष्ट
नवी दिल्ली
कोरोनाला हरवण्यासाठी सरकारकजडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना व्हायरस (Coronavirus) जगभरात फैलावू लागला आहे. त्याचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने मोठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरणाने आयुष्मान योजनेअंतर्गत कोरोना व्हायरसवरील उपचार समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून गरिबातील गरिब व्यक्ती सुद्धा खाजगी रुग्णालयांमध्ये याचा उपचार घेऊ शकतो.
आयुष्मान योजना मोदी सरकारच्या आरोग्यासंदर्भातील योजनांपैकी महत्त्वाची योजना आहे. NHA ने निर्णय घेतला आहे की, आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी या योजनेमध्ये येणाऱ्या खाजगी रुग्णालयांमध्ये जाऊन COVID-19 ची तपासणी करू शकतात.
जर कोरोना व्हायरसची लक्षण दिसून आली आणि संबधित व्यक्तीला आयसोलेशन सुविधा असणाऱ्या खाजगी रुग्णालयामध्ये भरती व्हावं लागलं तर याचा खर्चही या योजनेस सामाविष्ट करण्यात आला आहे. NHA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ET ला दिलेल्या माहितीमध्ये हे स्पष्ट होत आहे की, या योजनेअंतर्गत कोरोनाच्या तपासणीशिवाय जर तुम्हाला विलगीकरणासाठी खाजगी रुग्णालयात राहावं लागलं तर त्याचा खर्चही या योजनेअंतर्गत सामाविष्ट करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे व्हायरस इन्फेक्शनच्या पॅकेज अंतर्गत उपचारासाठी लागणारा खर्चही कव्हर करण्याचा NHA विचार आहे.