११ हजार कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा गृहखात्याचा निर्णय

११ हजार कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा गृहखात्याचा निर्णय



मुंबई :


कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग विचार करून राज्यातील विविध तुरूंगात असणा-या ११ हजार कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय गृहखात्याने घेतला आहे. राज्यातील विविध तुरूंगात सध्या मोठ्या संख्येने गुन्हेगार आहेत. सध्या देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भात मोठ्या प्रमामात वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टंसिंग विचार करून राज्यातील ११ हजार कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. ७ वर्ष किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील जवळपास ११ हजार आरोपी, गुन्हेगारांना तातडीने  पॅरोल देण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.पुढील आठवड्याभरात यावर कारवाई व्हावी अशाही सूचना दिल्या  आहेत. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्टिटरद्वारे दिली आहे.



 


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image